Saturday, July 27, 2024

लोहा तालुक्यात ऊसतोड कामगारांवर वीज कोसळून आणखी तीन जण ठार: बापलेकीसह कामगाराचा समावेश, दुपारीच हिमायतनगर तालुक्यातही वीज पडून एक शेतकरी ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लोहा (जि. नांदेड)- तालुक्यातील धावरी तांडा परिसरात काम करणाऱ्या मजुरावर मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कोसळली. यात तीन जण ठार झाले. तर जखमी बालिकेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारामध्ये काही ऊसतोड मजूर काम करत होते. आज दुपारपासूनच सर्वत्र ढग भरून आल्याने अचानक सायंकाळी वादळी वारे, विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. एका झाडाचा आसरा घेण्यासाठी कामगार माधव पिराजी डुबुकवाड (वय 45) राहणार पानभोसी, तालुका कंधार, मोतीराम शामराव गायकवाड (वय 46) राहणार पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी आणि दहा वर्षीय बालिका रूपाली पोचिराम गायकवाड हिच्यावर वीज पडली. यात तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. तर पूजा माधव डुबुकवाड ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीनही मृतदेह लोहा रुग्णालयात आणण्यात आले असून तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक व या भागातील सरपंच, पोलीस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातमी 👇🏻

दुपारीच हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे (वय 34) हे सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसात शेतातील सोयाबीनवर फारी झाकण्यासाठी धावपळ करत असताना दोन शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळली, त्यात सुनील वायकोळे जागीच ठार झाले तर दुसरा गजानन टोकलवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!