Monday, October 14, 2024

लोह्यातील बेपत्ता तरुण व्यापाऱ्याचा तलावात मृतदेह आढळला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लोहा – लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात लोहा शहरातील बेचाळीस वर्षीय बेपत्ता तरुण व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला आहे.

बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. १३ रोजी सकाळी उघडकीस आली.
शहरातील शिवकल्याण नगरातील रहिवाशी कृष्णा दिलीपराव फरकंडे (वय ४२) यांचे बसस्थानक परिसरात किराणा दुकान आहे. दि. १२ रोजी शनिवारी मयत कृष्णा यांनी दिवसभर दुकानावर बसून व्यवसाय केला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बाहेर जावून येतो म्हणून गेले ते उशिरापर्यंत घरी आले नाहीत म्हणून फरकंडे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे भ्रमणध्वनीवरून विचारणा केली. तसेच मयताचा भाऊ व दुकानातील नोकराने इतरत्र शोधाशोध देखील केली मात्र शोध लागला नाही. दि. १३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता त्यांचा भाऊ व नोकर हे शिवाजी चौकात उभे असताना त्यांना माहिती मिळाली की लोहा शहरानजीक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात एका व्यक्तीचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसत आहे. त्यांनी लगेचच तलावाकडे धाव घेवून पहिले असता सदर मयत व्यक्ती हा कृष्णा असल्याचे आढळून आले.

लोहा पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या तरूणाच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी मयतचा भाऊ सचिन दिलीप फरकंडे यांनी लोहा पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

कृष्णा फरकंडे यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!