Tuesday, May 21, 2024

वर्दी घातलेल्या बोगस अधिकाऱ्यास अटक; रेंज फॉरेस्ट ऑफिसर बनून फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मागील बऱ्याच दिवसापासून वनविभागाची वर्दी अंगावर चढवून रेंज ऑफिसर या पदाचे बनावट ओळखपत्र तयार करून फिरणार्‍या तोतया वन अधिकाऱ्यास मंगळवारी दि. २४ मे रात्री लातूर फाटा, नांदेड परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून वनविभागाचा लोगो असलेली दुचाकी आणि खाकी वर्दी जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध रीतसर कारवाई नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे.

जंगल एरियामध्ये वन अधिकारी म्हणून फिरणारा भामटा मागील काही दिवसापासून पोलिसांना व वन विभागालाही चकमा देत होता. अखेर तो लातूर फाटा येथे असल्याचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना समजले. त्यांनी आपले सहकारी अधिकारी फौजदार दत्तात्रय काळे यांच्या पथकाला रवाना केले असता येथे राहणारा आणि मुळचा निवघा तालुका हदगाव येथील कपिल पाईकराव नावाचा हा भामटा वन विभागाची वर्दी लावून स्कुटीवरुन लातूर फाटा परिसरात उभा टाकला होता.

यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ओळख पत्र दाखवले. याची खात्री वनविभागात केल्यानंतर हा अधिकारी आमच्याकडे नाही याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे फौजदार दत्तात्रय काळे यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!