ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
दहा लाख 19 हजार रुपयांचे चार हजार लिटर बायोडिझेल आणि इतर साहित्य जप्त
नांदेड- जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसापूर्वी याच परिसरात मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचा साठा जप्त करून काही आरोपींना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाजेगाव परिसरात एमखान मोटार गॅरेजजवळ महसूल विभागाने कारवाई करून दहा लाख 19 हजार रुपयाचे चार हजार लिटर बायोडिझेल आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
नांदेड तालुक्यातील वाजेगाव शिवार अंतर्गत सांगवी आसना ते वाजेगाव रस्त्याच्या बाजूला एमखान मोटार गॅरेज असून येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बायोडिझेल साठा करून विक्री करत असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना मिळाली. यावरून त्यांनी तहसील कार्यालय नांदेडचे मंडळ अधिकारी चंद्रकांत कगळे यांना ही माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावरून चंद्रकांत कगळे यांनी सदर ठिकाणी कारवाई करून प्लास्टिकच्या टाक्यामध्ये चार हजार 100 लिटर बायोडिझेल, प्लास्टिकच्या टाक्या, टँकर क्रमांक (एम एच झिरो चार 43 32) असा इतर साहित्य दहा लाख 19 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. चंद्रकांत प्रभू कगळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एमखान मोटार गॅरेज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻