Saturday, July 27, 2024

वाशीच्या जंगलात दगडाने ठेचून युवकाचा खून; नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय, हिमायतनगर तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हिमायतनगर (जि. नांदेड)- शहरातील एका युवकाचा तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलच्या भागात पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड हा मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या चेहरा  छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला असून त्याचा निर्घृणपणे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे दिसते आहे. याबाबत हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अशा चार आरोपींवर कलम ३०२, ३४ भादंवि नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हिमायतनगर शहरातील युवक पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड (वय ३२) रा. लाकडोबा चौक याचा मृतदेह हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात दि.८ सप्टेंबर रोजी तीन वाजेच्या सुमारास छिन्नविच्छीन अवस्थेत आढळून आला. मयत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना आरोपींनी त्याला बोलावून सोबत नेले. आणि त्यास वाशीच्या जंगलच्या भागात घेऊन जाऊन इतर साथीदाराच्या मदतीने निर्घृणपणे दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.

मयत युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सदरील व्हिडीओ कुणी काढला, कसा व्हायरल झाला, त्या मृतदेहाच्या शेजारी लिंब, तांब्या आणि फुले दिसत असल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याची चर्चा व आरोप नातेवाइकांसह घटनास्थळावर गेलेल्या नागरीकातून केला जात आहे. दरम्यान आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, खुनाच्या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

जंगल भागात मयत युवकांच्या चेहऱ्याची स्थिती पाहता मयत युवकांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून खून केला. अशी फिर्याद दिल्यावरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमत करून खून केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 302, 34 भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर, हवालदार हेमंत चोले, अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर अधिक तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!