Wednesday, November 29, 2023

विक्की ठाकूर खून, गोळीबार प्रकरण; बिगानिया टोळीतील ११ आरोपींवर मोक्का अंतर्गत दोषारोपपत्र दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पोलीस स्टेशन इतवारा नांदेड हद्दीत दि. २० जूलै २०२१ रोजी साडेसात वाजताचे सुमारास रेणूकामाता मंदीराजवळ कांही अनोळखी इसम तीन मोटारसायकलवर, गावठी कट्टे (पिस्टल), तलवारी, खंजीर अशा हत्यारांसह आले. त्यांनी गोळीबार करून खंजीर व तलवारीने भोसकून विक्की ठाकूर याचा खून केला व मयत विक्की ठाकूरचा मित्र सूरज खिराडे यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावरून पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड येथे गु.र.न. 176/2021 कलम 143, 144, 147, 148, 1498,302, 307,120 (ब). 294. भा.द.वी. सह कलम 3, 4 / 25, 27 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी नितीन जगदीश बिगानिया वय ३२ वर्षे, रा. रवी नगर, जूना कौठा, नांदेड, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी ऊर्फ गव्या बालाजी धोंगडे, गंगाधर अशोक भोकरे, सोमेश ऊर्फ सोम्या सूरेश कत्ते, कृष्णा ऊर्फ किन्ना छगनसिंग परदेशी, लक्ष्मण ऊर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, कैलाश जगदीश बिगानिया, अंजली भ्र नितीन बिगानिया, ज्योती जगदीश बिगानिया यांना गुन्ह्यात अटक करून तपास केला.

त्यादरम्यान वरील आरोपींचे संघटीत गुन्हेगारीचे रेकॉर्ड आढळून आल्याने तपासीक अंमलदार साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड यांनी नमुद गुन्ह्यामध्ये मोक्का कलम वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा डॉ. सिद्धेश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्याकडे पाठवीला असता, नमुद गुन्ह्यामध्ये मोक्का कलम वाढ करण्याची परवानगी दिनांक १३/१०/२०२१ रोजी प्राप्त झालेली होती. त्यावरून सदर गुन्ह्याचा पूढील तपास डॉ. सिद्धेश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यानी करुन सदरची फाइल दोषारोपपत्रासह परवानगी मिळणेसाठी अति. पोलीस महासंचालक म. रा. मुंबई याचे कार्यालयात दाखल करुन व परवानगी हस्तगत करुन वरील नमुद एकुन (११) आरोपी विरुद्ध मोक्का कलमा अंतर्गत दोषारोपपत्र मा. मोक्का न्यायालयात दिनांक २८/१२/२०२१ रोजी दाखल केले आहे.

वरील बिगानिया टोळीविरुद्ध मोक्का कलम लावण्यापूर्वी स.न. २०२० मध्ये जुना मोंढा भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात लखन ठाकूर ( डि) गँगचे एकूण सहा (०६) आरोपी विरुद्ध मोक्का कलमाअंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यावरुन नांदेड शहरातील गँगवार प्रकरणात इतवारा, पोलीसांनी मुख्य टोळीचे फास आवळल्याचे दिसून येत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!