Friday, March 29, 2024

विधानमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन; वंदे मातरम्‌ने कामकाजास सुरुवात

नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्य जितेश अंतापुरकर यांचा संसदीय कार्य मंत्र्यांनी सभागृहाला करून दिला परिचय

        मुंबई: विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली.  विधानसभेत वंदे मातरम्‌ने सकाळी 11 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सन्माननीय मंत्री  आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी करून दिला नवीन सदस्याचा परिचय

        यावेळी नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य जितेश अंतापुरकर यांचा संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सर्वांना परिचय करून दिला.

         राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब तसेच मंत्री मंडळातील सदस्य, विधीमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!