Friday, March 29, 2024

विविध कंपन्यांचा 1 कोटी 5 लाख रुपयांचा गुटखा जाळला; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पाच गुन्ह्यातील गुटखा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड- विविध कंपन्यांचा 1 कोटी 5 लाख रुपये किंमतीचा गुटखा आज नवीन नांदेड भागात जाळून नष्ट करण्यात आला. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील विविध पाच गुन्ह्यातील प्रतिबंधीत असलेला अवैधरित्या विक्रीसाठी आणल्यानंतर जप्त केलेला हा गुटखा होता. न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न भेसळ अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या उपस्थितीत गोळीबार सराव, पांगरी शिवारात हा गुटखा पंचासमक्ष आज जाळून नष्ट करण्यात आला.

राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला नामांकित कंपन्यांच्या गुटखा गुन्हा रजिस्टर नंबर ४५३/१९,५३८/१९ ,३३८/२०, २११/२११,१५४/२१ या पाच गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला होता.  राजु ईलायाची, मुसाफीर पान मसाला, रजनीगंधा, राज निवास, विमल, बाबा १२० सुंगधी तंबाखू, वजीर केशर युक्त, दिलदार सुंगधी, ए.ए.गुटखा, वजीर एम ४ सुंगधी तंबाखू,जसु सुंगधी,-एन.पी.०१, बाबा १२० सुंगधी तंबाखू, बाबा १६० सुंगधी तंबाखू, एम,सुंगधी तंबाखू, आरएमडी पान मसाला, वि.एक सुंगधी तंबाखू, नजर ९०००, गोल्डन बिना लेबल सुंगधी तंबाखू, सिल्व्हर केट, बिना लिबेल सुंगधी तंबाखू, सागर पान मसाला, सागर जर्दा यासह अनेक कंपन्यांचे व विविध प्रकारांचे सुंगधी मसाले, तंबाखू जाळण्यात आले आहेत. एकूण पाच गुन्ह्यातील सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किंमतीचा हा गुटखा होता.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्याशी चर्चा करून न्यायालयात या प्रकरणी कागदपत्रे दाखल केली होती. न्यायालयाने हा गुटखा नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व अन्न भेसळ नांदेड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त उमेश कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व लेखा विभागाचे पोहेका गौतम कांबळे यांनी १८ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष जप्त केलेला हा गुटखा तीन वाहनांद्वारे गोळीबार मैदान, पांगरी येथे जाळुन नष्ट केला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!