Monday, June 17, 2024

विष्णुपुरीजवळ लातूर- नांदेड बसवर दगडफेक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा

नवीन नांदेड- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातुर- नांदेड बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडण्यात आल्या. नांदेड रोडवरील महाराष्ट्र पंजाब बारसमोर ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात इसमाने  एम.एच.13 सी.यु. 9352  बसचा समोरील काचेवर दगडफेक करून बसच्या काचा फोडुन नुकसान केले आहे. आज दि. 13 जानेवारी रोजी सकाळच्या वेळी वहक राजेश सिद्राम जिडगे (बस क्रमाक  MH 13 CU 9352) लातुर येथुन प्रवाशी घेऊन नांदेड लातूर रोडवरील महाराष्ट्र पंजाब बारसमोर आसर्जन जवळ आली असता अज्ञात इसमाने बसच्या समोरील काचावर दगड मारून अंदाजे 15,000 हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद चालक विश्वनाथ गिते यांनी दिली. यावरून  कलम 427 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गिते हे करीत आहेत. घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळ नांदेड आगाराचे पर्यवेक्षक इंगळे व्हि,पी. व सुरेश फुलारी यांनी भेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ही दगडफेक करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कारणांचा तपास पोलीस करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!