Saturday, April 20, 2024

व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनाबाबत आलेल्या निनावी पत्राचा पोलिसांनी लावला छडा; शेतीच्या वादातून अडकवण्यासाठी पत्र पाठविल्याचे उघड

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनाबाबत पाठविण्यात आलेल्या पत्राचा पोलिसांनी लावला छडा लावला आहे.  शेतीच्या वादातून एकाला अडकवण्यासाठी हे पत्र पाठविण्यात आल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. राज्यभरात गाजत असलेल्या संजय बियाणी यांच्या खुनाबाबत या पत्रात उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली होती.

शहरातील व्यापारी संजय बियाणी यांची निवासस्थानासमोर गोळ्या झाडून अनोळखी हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. मात्र संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले. ज्यामध्ये “बहुत बड़ा दादा पांडूरंग येवले आनंदनगर मे रहता है, आटाळा का रेती माफिया है. इसमे परभणी मे कोई बिल्डर नहीं रहेगा, इसलीए बियाणी को ठोकने का मनसुबा बनाया गया ” वगैरे आशयाचे पत्र पाठविल्यावरून सदरील पत्र बियाणी यांचे कुटुंबीयांनी विशेष तपास पथक (S.I.T.) यांचेकडे सुपूर्द केले.

सदरील पत्राच्या अनुषंगाने एसआयटीने कसून तपास केला असता, हे पत्र विठ्ठल संतराम सुर्यवंशी (वय ७४ वर्ष, राहणार आटाळा, तालुका धर्माबाद, जि. नांदेड) यांनी पांडुरंग येवले यांना सदर गुन्ह्यात अडकवण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून पांडुरंग येवले यांना अटक केली जावी व पांडूरंग येवले या प्रकरणात अडकून त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने परभणी येथून सदरील पत्र पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. शेती विषयक वैयक्तिक वादातून हे पत्र लिहिल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप भानुदास गौंड, पोलीस स्टेशन विमानतळ यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन विमानतळ येथे गु.र.नं. १३०/२०२२ कलम ४१९. १८२. १९२ भा.द.वि. अन्यये सदर व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस स्टेशन विमानतळ हे करीत आहेत.

सदरील कार्यवाही निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड व प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस स्टेशन विमातनळ, पोलीस उप निरीक्षक प्रदिप भानुदास गौड, पोलीस स्टेशन विमानतळ व पोलीस उप निरीक्षक घेवारे जिल्हा हिंगोली यांनी केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!