Sunday, May 19, 2024

व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली; हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी पाळला बंद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांची भेट घेतली. या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री चव्हाण यांच्यासह खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नेते, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक अंत्यसंस्कारास उपस्थित होते.

संबंधित बातमी 👇🏻

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खूनप्रकरणी दोषींना तत्काळ अटक व्हावी, अशी तीव्र मागणी होत आहे. मंगळवारी दि. 5 एप्रिल रोजी बियाणी यांच्या राहत्या “राज” बंगल्याबाहेर दोन हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडून त्यांची भर दिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने  नांदेड हादरले असून या प्रकरणी दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातमी 👇🏻

संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार दि. सहा रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच बियाणी यांची अंत्ययात्रा संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखून धरली. या अंत्ययात्रेत नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आला होता. आरोपीं आणि त्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा पुढे नेणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंत्ययात्रा पुढे गेली.

दरम्यान, या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गुंडांनी त्यांना अगदी जवळून मारल्याचे त्यात दिसले. नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणारे म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी खंडणी वसुलीसाठी त्यांना धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. खंडणीखोरांनीच संजय बियाणी यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप संजय बियाणी यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांच्या पत्नीने तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. या बंदला सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

अशोक चव्हाण यांनी संजय बियाणी यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

बुधवारी सकाळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड येथे आगमन झाले ते संजय बियाणी यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी नांदेडला परत आले होते. विमानतळाहून त्यांचा ताफा थेट संजय बियाणी यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यांनी संजय बियाणी यांच्या पार्थिवाला अभिवादन केले. कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपींना लवकरच पकडण्याची ग्वाही दिली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश आणि त्यांच्या भावना लक्षात घेता पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत.

संजय बियाणी यांची हत्येची घटना ही निषेधार्ह असून मनाला वेदना देणारी आहे. आगामी काळात नांदेडकरांना प्रगतीसोबतच सुरक्षेची हमी देऊन अशा घटनावरती पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची अशा घटनेमुळे मान शरमेने खाली गेल्याचे ना. चव्हाण म्हणाले. मनाला वेदना देणारी घटना असून यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, जे सत्य आहे ते नक्कीच नांदेडकरांसमोर येईल असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

मान्यवरांनी व्यक्त केला शोक

नांदेडचे प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला व त्यातून झालेला त्यांचा मृत्यू ही घटना मनाला चटका देऊन जाणारी आहे. माझा तर विश्वास बसत नाही. माझ्या परिवारातला माणूस गेल्याने पोलिसांनी या घटनेत गांभीर्याने लक्ष घालून आरोपींचे पाळेमुळे शोधून काढावे अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला.

संजय बियाणी हे माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या मारेकऱ्यांना नांदेड पोलीस नक्कीच शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा देतील असा विश्वास व्यक्त करत बियाणी कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची तुळजाभवानी शक्ती देवो अशी प्रार्थना शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली.

काही मिनिटांपूर्वी माझ्याशी ते संवाद साधून गेले आणि काही वेळातच मला समजले की बियाणी यांच्यावर गोळीबार झाला तर माझा विश्वास बसत नव्हता. नांदेड पोलिस या आरोपींना शोधून काढून संजय बियाणी यांना न्याय देतील असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!