ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शशिकांत महावरकर यांची नांदेड परिक्षेत्राचे नवे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल अडीच महिन्यांनी नांदेडच्या नवीन डीआयजींची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची बदली डिसेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती. तेंव्हापासून हे पद रिक्त होते. या पदाचा पदभार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना शर्मा यांच्याकडे होता. तेही मधल्या काळात सुट्टीवर गेल्याने सध्या नांदेड परिक्षेत्राचा पदभार डॉ. जय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता.
आता गृह विभागाने आज मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राज्यातील आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून एस. एच. महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गृह विभागाने प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. शासनाचे सहसचिव वेंकटेश भट्ट यांच्या स्वाक्षरीने राज्यातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून एस. एच. महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अडीच महिन्यांनी नांदेड रेंजला डीआयजींची नियुक्ती झालेली असल्याने नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील रेंज अंतर्गत पोलीस अधिकारी बदल्या रखडल्या होत्या, त्या आता मार्गी लागू शकणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻