Wednesday, July 24, 2024

शहरात दोन गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ विमानतळ आणि शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

नांदेड– काल बुधवारी विमानतळ पोलिसांनी पिस्तुलधारी युवकास अटक केल्यानंतर आज गुरुवारी सकाळी शिवाजीनगर पोलिसांनीही पिस्तुलधारी युवकास अटक केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तुलधारक असल्याचे यावरून दिसून येत आहे.

विमानतळ पोलिसांनी काल बुधवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी एका युवकाच्या ताब्यातून गावठी पिस्तुल जप्त केले. या पिस्टलसोबत मॅग्झीन मात्र नाही. या प्रकरणात तीन लोकांविरुध्द विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, त्यांचे सहकारी पोलीस कलंदर आणि गंगावरे हे काल गस्त करत असतांना त्यांना चंद्रलोक हॉटेलसमोर एकाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. ही बाब त्यांनी पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांना सांगितली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते आणि पोलीस अंमलदार नागरगोजे यांना सोबत घेवून पोलीस पथक तेथे पोहचले, तेव्हा एका व्यक्तीच्या कमरेला एक गावठी पिस्तुल सापडले. ऋषीकेश आनंदराव मोरे (वय 26) रा.गांधीनगर असे त्याचे नाव आहे.

त्याची तपासणी केली असता त्याच्या ऋषीकेश मोरेच्या सांगण्याप्रमाणे ही पिस्टल प्रविण उर्फ बाळू खोब्रे रा.गांधीनगर याची आहे. ही पिस्टल अनिल उर्फ रंगराव भांडवले याच्या घरातून घेवून येण्यास प्रविण खोब्रेने सांगितले होते. ती पिस्टल आणल्यावर माझ्याकडेच ठेवण्यास सांगितली असे तो सांगतो. पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या ऋषीकेश मोरेला ताब्यात घेतले असून आरोपीचे साथीदार प्रविण उर्फ बाळू खोब्रे, अनिल रंगराव भांडवले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.

आज शिवाजीनगरमध्ये…

आज शिवाजीनगर भागात एका युवकाकडे गावठी पिस्तुल सापडले. त्याने अगोदरच जबरी चोरीचा गुन्हा केला असल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आहे. ही जबरी चोरी नई अबादी येथील शेख इरफान शेख गुड्डू उर्फ कुबडा (वय 23) याने केली होती. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार संजय मुंडे, रामकिशन मोरे, शेख लियाकत, राजकुमार डोंगरे, मधुकर अवातिरक आदी शेख इरफानच्या शोधात होते.  आज शहराच्या डॉक्टर्सलेन भागात एक व्यक्ती पिस्तुलसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला पकडले तेंव्हा तो शेख इरफान शेख गुड्डू उर्फ कुबडा हाच होता. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे 45 हजार रुपये किंमतीचे पिस्तुल आणि एक दुचाकी गाडी (किंमत 85 हजार रुपये) असा 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. शेख इरफान विरुध्द शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!