Wednesday, July 24, 2024

रस्ते बांधकामातील प्रसिद्ध कंपनी ‘शारदा कन्स्ट्रक्शन’ला 49 लाखांचा दंड, धर्माबादच्या तहसीलदारांची धाडसी कारवाई; विनापरवाना मुरुमाचे उत्खनन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ धर्माबाद– रस्ते आणि बांधकाम क्षेत्रातील मोठी कंपनी असणाऱ्या ‘शारदा कन्स्ट्रक्शन’ कंपनीला तब्बल 49 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. धर्माबादच्या तहसीलदारांनी ही धाडसी कारवाई केली आहे. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी शारदा कन्स्ट्रक्शनने या भागातून विनापरवाना मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

तालुक्यातील करखेली शिवारात अनधिकृतपणे मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला 48 लाख 96 हजार रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. हा दंड करखेली मंडळ अधिकारी यांनी वसूल करून शासन दरबारी जमा करावा असा आदेश धर्माबादचे तहसीलदार शिंदे यांनी जारी केला आहे. या आदेशामुळे अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

धर्माबाद तालुक्यात शारदा कंस्ट्रक्शन कंपनीचे मागील काळात काम सुरू होते. या कामाला लागणारे गौण खनिज मुरमाची करखेली शिवारातील गट क्रमांक 580 मधून शासनाचा कोणताही महसूल न भरता शारदा कंस्ट्रक्शन कंपनी, नांदेड यांनी मुरूम उत्खनन करून तो रस्त्यांच्या कामासाठी वापरला. संबंधितावर कारवाई करण्यासाठी मागील दोन वेळेस कंपनीला महसूल विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला. मंडळ अधिकारी करखेली यांनी गट क्रमांक ५८० यांमधून शारदा कंस्ट्रक्शन कंपनी यांनी अंदाजे तेराशे साठ ब्रास मुरूम विनापरवानगी शेत मालकाची संमती न घेता नेल्याचे दिसून आले.

तसेच शारदा कंस्ट्रक्शन कंपनी यांनी एक डिसेंबर 2020 रोजी नोटीसद्वारे आठ डिसेंबर 2020 रोजी उपस्थित राहून पुराव्यानिशी खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु संबंधित प्रतिवादी उपस्थित राहिले नाही व नोटीसीचा खुलासा सादर केला नाही. विशेष म्हणजे सुनावणीस अनुपस्थित राहून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसा रीतसर अहवाल मंडळ अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्याकडे सादर केला. उपविभागीय अधिकारी तहसीलदार धर्माबाद यांच्याशी पत्रव्यवहार करून ही बाब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 पोट कलम 7 व 8 (1) (2) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ व 12 जानेवारी 2018 मधील परिच्छेद 9 मधील तरतुदीप्रमाणे व संदर्भीय पत्र क्रमांकानुसार परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे अनधिकृत गौण खनिजाचा साठा करण्याचा व विल्हेवाट लावण्याचा उद्देश व अवैध उत्खनन केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 पोटकलम 7 व ८ (1) (2) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चारमधील परिच्छेद तरतुदीप्रमाणे तहसीलदार धर्माबाद यांनी त्यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करत सदरील मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

सदर कंपनीने 48 लाख 96 हजार रुपयांचे मुरूम विनापरवानगी उत्खनन केल्याचे आढळून आल्याने सदरची रक्कम त्यांना जमा करण्यासाठी तसे पत्र देण्यात आले आहे. हा आदेश 15 मार्च रोजी तहसीलदार शिंदे यांनी जारी केला आहे. यामुळे अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!