Wednesday, April 17, 2024

शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायकराव मेटे यांचं अपघाती निधन; मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई– शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नाही.

या अपघातानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकही यात गंभीर जखमी झाले असून त्यांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येते. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने विनायक मेटे निघाले होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताच्या एक तासानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.


अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही

अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. विनायक मेटे हे मूळचे बीड जिल्ह्यातील होते. तर नांदेडच्या वसंतनगर येथील आनंदराव लाठकर यांचे ते जावई तर आयपीएस अधिकारी, झारखंड राज्यातील अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांचे ते मेहुणे होत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!