Wednesday, July 24, 2024

शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्या नांदेडमध्ये! शासकीय रुग्णालयास भेट देऊन रुग्णांशी करणार चर्चा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उद्या सोमवारी नांदेडमध्ये येत आहेत.

येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी व एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे उद्या सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या समवेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख बबनराव थोरात येणार आहेत.

माजी मंत्री आदित्य ठाकरे सकाळी साडेअकरा वाजता विशेष विमानाने नांदेडच्या गुरुगोविंद सिंग विमानतळावर पोहोचणार असून पावणेबाराच्या सुमारास ते जिल्हा रुग्णालय विष्णुपुरी येथे भेट देणार आहेत. तेथील रुग्णांच्या नातेवाईकांचे व अन्य रुग्णांची विचारपूस करणार आहेत. तसेच अधिष्ठाता व विविध विभागांच्या विभाग प्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर रुग्णालय परिसरातच सव्वाबाराच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता परत विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!