Monday, May 27, 2024

शिवसेनेचे माजी आमदार, दोन जिल्हा प्रमुखांसह अनेकांवर गुन्हे दाखल; आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन त्यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करून पोस्टर जाळण्याचा प्रयत्न नांदेडमध्ये शिवसेनेकडून करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक माजी आमदार, दोन जिल्हाप्रमुखांसह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिवसेनेविरोधात बंड करून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे जिल्हा शिवसेनेमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला. त्यातूनच बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निषेधार्थ मागील दोन- तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात जागोजागी शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या घरासमोरही शिवसैनिकांनी हल्ला करत निषेध केला. त्यानंतर काल रविवार दि. २६ जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन, त्यानंतर विश्रामगृहासमोर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांचे फोटो असलेले फलक जाळण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जमाबंदी लावलेली असताना हे आंदोलन करून या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याबाबतचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, तालुकाप्रमुख जयवंत कदम, उपजिल्हाप्रमुख बबन बारसे, प्रदीप उर्फ पप्पू जाधव, माजी विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक डॉ. निकिता चव्हाण, तालुका संघटक निकिता शहापूरवाड, सोशल माध्यमाचे गौतम जैन, अर्धापूरचे तालुकाप्रमुख संतोष कपाटे, नवज्योतसिंग गाडीवाले, युवासेनेचे व्यंकटेश मामीलवाड यांच्यासह सुनील शिंदे आणि इतर शिवसैनिकांवर कलम 135 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करत आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख आणि पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर, फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!