Thursday, February 9, 2023

शिवाजीनगरमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांना आग; तीन गाड्या जळून खाक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

https://youtube.com/shorts/xKXJMh-7RDE?feature=share

नांदेड– शिवाजीनगर पोलीसांनी जप्त केलेल्या विविध गुन्ह्यातील तीन चारचाकी गाड्यांना आज मंगळवार दिनांक 17 मे रोजी दुपारच्या वेळी आग लागून जळून खाक झाल्या आहेत. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली.

शिवाजीनगर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेल्या मारूती ओमिनी, टाटा विस्टा आणि टाटा सुमो या तीन गाड्या पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस भंगार अवस्थेत पडून होत्या. त्यांचा काही लिलाव करण्यात आला नव्हता. या गाड्यांच्या आजूबाजूला कचरा साचला होता. दुपारी अडीचच्या सुमारास या कचर्याला आग लागली. आणि यातच तीन गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत ह्या तीनही गाड्या जळून खाक झाल्या होत्या. शिवाजीनगर पोलिसांनी व उपस्थित काही नागरिकांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या ठिकाणाजवळच महावितरणचा डीपी होता. आग आटोक्यात लवकर आल्याने मोठा अनर्थ टळला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,706FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!