ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड) : तालुक्यातील शेतकर्यांना विविध नैसर्गिक संकटांना समोर जावे लागले असून संकटाची ही मालिका सुरूच आहे. आता शेतकर्यांना वन्य प्राण्यांच्या हैदोसाला समोर जावे लागते आहे. या तालुक्यातील अनेक भागात रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतातील पिके उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला जात असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या भागात रानडुकरे पिके झाडे उखडून शेतीची आतोनात नासाडी करीत आहेत. रानडुकरांच्या कळपाने अर्धापूर तालुक्यातील बाळापूर शिवारातील काढणीस आलेल्या हरभऱ्याचे आतोनात नुकसान केले. असाच प्रकार या भागात इतरही शिवारात झाला आहे. यात काढणीस आलेले सरासरी दोन एकर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. दाभड येथील शेतकऱ्यांची बाळापुर शिवारात गट नं.२ व ग.नं.१७ अनेक एकरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दाभड येथील पद्मिनबाई शिवाजीराव दवे यांचे शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यांनी त्यांच्या शेतीत हरभरा पिकाची लागवड केली होती. पिकाची योग्य निगा राखल्याने वाढही चांगली झाली. त्यामुळे, मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगले उत्पन्न येईल अशी खात्री त्या बाळगून होत्या. पण रानडुकराच्या कळपाने त्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या हरभरा पिकाची अतोनात नासाडी केली आहे.
रानडुकरांचे कळप येतात आणि शेतातील पिकांची नासाडी करीत शिवराशिवारांनी निघून जातात. वन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. आधीच हवामानातील बदलामुळे शेतीचे नुकसान झाले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशात हे वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी, डोळ्यात तेल टाकून रात्रभर शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे.
● हंगामात उपद्रव तीव्र
अलीकडे ग्रामीण भागात रानडुक्कर व वानर आदी प्राण्यांकडून शेतीचे नुकसान व शेतकऱ्यावरील हल्ल्यांत वाढ झालेली दिसून येत आहे. डिसेंबर नंतरच्या काळात ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसतात.
● प्रतिक्रिया
वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल त्या पाठोपाठ रानडुक्करांकडुन शेतीची नासाडी शेतीवरील संकटांमुळे शेती करणे अवघड झाले आहे.शासनाने उपाययोजना कराव्या व नुकसान भरपाई धावी.
– पद्मिनबाई दवे
दाभड (बाळापूर) ता.अर्धापूर
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻