Saturday, June 22, 2024

श्रीक्षेत्र बोरी (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भाविकांनी लाभ घेण्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आवाहन

कंधार- तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरी (बु) येथे  शिवशंकर ट्रस्ट, महादेव मंदिराच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली ५ ते १२ डिसेंबर दरम्यान ह भ प तुकाराम मुंडे शास्त्री यांची श्रीमद् भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

दररोज पहाटे ४ ते ६ दरम्यान काकडा आरती, सकाळी ७ ते १० गाथा पारायण, सकाळी ११ ते २ श्रीमद् भागवत कथा, दुपारी २ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ६ ते ८ महाप्रसाद, रात्री ९ ते ११ कीर्तन. त्यानंतर हरिजागर असे विविध दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत. रविवार ५ डिसेंबर रोजी ह.भ.प.शंकर महाराज मसलगेकर, सोमवार ६ डिसेंबर रोजी ह. भ. प. ज्ञानोबा माऊली गुंडेवाडीकर, मंगळवार ७ डिसेंबर रोजी ह.भ.प. रोहिदास महाराज कळकेकर, बुधवार ८ डिसेंबर रोजी ह.भ.प.मधुसुदन महाराज कापसीकर, गुरुवार ९ डिसेंबर रोजी ह.भ.प. रंगनाथ महाराज ताटे पोखरभोसीकर, शुक्रवार १० डिसेंबर रोजी ह.भ.प. विष्णू महाराज अंबेजोगाईकर, १९ डिसेंबर रोजी ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर, १२ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. तुकाराम शास्त्री मुंडे परळीकर आदी कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. यावेळी बोरी (बु), कागणेवाडी, नावंदेवाडी, पाताळगंगा, टोकवाडी, कळका, कळकावाडी, शेल्लाळी, वाखरड, वाखरडवाडी, पिंपळाचीवाडी, ब्रम्हवाडी, अंबुलगा, गऊळ, खंडोबाचीवाडी, फुलवळ, उमरज, मंगनाळी, पेठवडज, शिरसी, गोणार, हरनाळी, गुंडेवाडी, तांदळी, मोहिजा आदी गावातील गायनाचार्य, मृदंगाचार्य व भजनी मंडळी साथ देणार आहेत. तर हरिपाठ प्रमुख ह. भ. प. ज्ञानोबा माऊली उमरजकर, ह.भ.प.लहु महाराज व गाथा पारायण प्रमुख ह.भ.प.मोहनराव बेळकोणीकर असणार आहेत.

यावेळी ह.भ.प.गोपीनाथ गुरुजी भाडगावकर, मुखेड- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, किनवट विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहाची सांगता दिनांक १२ डिसेंबर रोजी  महाप्रसादाने होणार आहे.या सप्ताहाचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंकर ट्रस्टचे अध्यक्ष तथा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, जि.प.सदस्या सौ. प्रणिताताई देवरे – चिखलीकर, कंधार  कृऊबा समितीचे माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर, लोहा कृऊबा समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, बोरी (बु) गावचे सरपंच बालाजी झुंबाड व उपसरपंच सौ. माधुरी सांगवे आदींनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!