Tuesday, March 28, 2023

श्रीक्षेत्र माहूर येथील पांडवलेणी तलावात आढळले मायलेकींचे मृतदेह, घातपाताचा संशय; माळेगाव यात्रा येथील सटवाई तलावातही एका महिलेचा मृतदेह आढळला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

श्रीक्षेत्र माहुर/ लोहा (जि. नांदेड)- श्रीक्षेत्र माहूर येथे पदयात्रेसोबत आलेल्या परभणी जिल्ह्यातील मायलेकींचे मृतदेह माहुरच्या पांडवलेणी तलावात आढळून आले आहेत. तर इकडे लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथील सटवाई तलावातही एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

परभणी जिल्ह्यातील चारठाना येथील फुलाबाई चीनकीराम मोरे (वय ५० वर्षे) व नर्मदा प्रकाश पजई (वय ३० वर्षे) या मायलेकीचे मृतदेह माहूर गडापासून सुमारे दोन किमी अंतरावरील पांडवलेणी तलावात तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत पंचनामा करून दोन्ही प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नर्मदेच्या तोंडाला फेस आल्याचे दिसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील दिनकरराव देशपांडे महाराज यांचे मार्गदर्शनात दि.३ फेब्रु.रोजी सुमारे ६५ भाविकांची पदयात्रा निघाली. दि.९ फेब्रुवारी रोजी ही पदयात्रा माहूरला पोहचली. या यात्रेतील भाविकांनी दिवसभर देव देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्री शहारातील श्री रेणुकाभक्त निवास धर्मशाळा व विष्णूकवी मठात त्यांनी मुक्काम केला. आज दि.१० फेब्रुवारी रोजी पदयात्रा परत निघाली असता मयत नर्मदाची तीन वर्षीय मुलगी दिसून आली, मात्र त्या दोघी मायलेकी दिसून आल्या नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शेवटी पोलिसांना सूचना देण्यात आली.

त्यानंतर लांजी येथील शेतकरी अंबादास कमठेवाड यांनी सदर तलावात दोन प्रेतं तरंगत असल्याची माहिती  पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही प्रेत ग्रामीण रुग्णालयात आणले. सदर घटनेची माहूर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पो. नि. नामदेव रिट्ठे यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद राठोड व पोहेकॉ सुशील राठोड हे पुढील तपास करीत आहेत. दोन्ही मयत महिलांची ओळख बाळासाहेब किसनराव झाडे रा.धानोरा यांनी पटवून दिली. शहरानजीक मातृतीर्थ तलाव, भोजन्ती तलाव व अनेक कुंड असतांना त्या दोघी मायलेकी तिथे त्या तलावातच का गेल्या ? कुणासोबत गेल्या? या सर्व बाजू पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. हे बुडून मृत्यू, आत्महत्या कि घातपात असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.

माळेगाव यात्रा परिसरातील तलावातही महिलेचा मृतदेह आढळला

लोहा- तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा परिसरातील सटवाई तलावात बुडून अहमदपूर येथील त्रेपन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि. १० रोजी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी माळाकोळी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली.

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा परिसरातील तलावात एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे कांही नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बाब काही नागरिकांनी माळाकोळी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जावून सदर मृत महिलेस सटवाई तलावाबहेर काढून पंचनामा केला.  मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी परिसरात संदेश देण्यात आला होता. त्यानंतर सदर मृत महिला ही अलीमुन जब्बार बागवान (वय ५३) रा. बागवान कॉलनी, अहमदपूर जि. लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

मयताच्या नातेवाईकांनी मयत महिला ही वेडसर असल्याचे सांगितले असून वेडाच्या भरात सदरील घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला. याप्रकरणी माळाकोळी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनी माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,753FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!