Saturday, July 27, 2024

श्री राम वन गमन शोभायात्रेच्या आयोजकांसह अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरातून श्रीराम वन गमन शोभायात्रेच्या आयोजकांसह जवळपास अडीच हजार राम भक्तांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून शोभायात्रा शहराच्या बाहेर पडताच ही कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवार दि. 15 मार्च रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीनच्या सुमारास जुना मोंढा येथे श्री राम वन गमन शोभायात्रेची मिरवणूक काढण्यात आली. विनापरवानगी, काढण्यात आलेल्या या यात्रेमुळे ध्वनि प्रदूषण तसेच कोरोनाचा प्रसार होईल अशी कृती करुन व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पोलीस हवालदार पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून यात्रा आयोजक गणेशसिंह ठाकूर, सागर जोशी, अमोल कुल्थीया, ऍड. दिलीप ठाकूर, चेतन पंडित, ओमकार कुलकर्णी, संतोष उर्फ कालु ओझा, शशिकांत पाटील, महेश देबडवार, गजानन चंदेल यांच्यासह जवळपास अडीच हजार रामभक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राठोड करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!