Saturday, July 27, 2024

संकटमागून संकटं; शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे सोयाबीन जळून खाक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुक्रमाबाद परिसरात सोयाबीन गंजीला आग

मुक्रमाबाद (मुखेड)- येथील खतगाव (प.मु.) शिवारात रात्री उशीरा सोयाबीनच्या गंजीला अचानक आग लागून सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी कुटूंब संकटात आले आहे. ऐन अडचणीत इंदरबाई गुंडेराव गुबनरे या महिला शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख ६० हजार रुपयाचे नुकसान झाल्यामुळे या पिडीत मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहे. विविध नैसर्गिक आपत्तींना शेतकरी मोठ्या हिंमतीने सामोरे जात असताना शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटं येत आहे.

मुखेड तालुक्यातील खतगाव प.मु येथील माजी सरपंच गुंडेराव गुबनरे यांची पत्नी नामे इंदरबाई गुबनरे यांचे खतगाव शिवारातील गट नंबर १६३ मध्ये सोमवारी तुरीचे खळ चालु आहे. रात्री कुटुंब प्रमुखासह कांही जण खळ्यावर झोपले होते. पण रात्री बारा वाजता खळ्यापासून कांही अंतरावर असलेल्या सोयाबीनच्या गंजीस अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की त्यात पूर्ण सोयाबीन जळून खाक झाले.

ही आग मोठी असल्यामुळे विजवता आली नाही. या आगीत ३ लाख ६० रुपयांचे नुकसान झाले असून या कुटुंबाचे आर्थिक कंबरडेच यामुळे मोडले आहे. त्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बालाजी पसरगे यांनी केली आहे. आम्ही पंचासमक्ष पंचनामा केला आहे. हा अहवाल तात्काळ तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे सादर करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी मारोती श्रीरामे यांनी दैनिक ‘गोदातीर समाचार’शी बोलताना दिली. सपोनि संग्राम जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!