ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीबाबत दिलेली माहिती 👇🏻
नांदेड- संजय बियाणी हत्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी या हत्या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती ना. अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तर याच प्रश्नी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नवी दिल्लीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
संबंधित बातमी 👇🏻
या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले. माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात देण्यात आल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻