ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- ऐन सणासुदीच्या काळात नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्या तीन दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
सध्या नवरात्र महोत्सव सुरू असून दसरा- दिवाळी हा अत्यंत महत्वाच्या सणांचा हा काळ आहे. याच काळात प्रवाशांसाठी अधिकच्या रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्याऐवजी रेल्वे विभागाने चक्क सध्या सुरू असणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. नांदेडहुन पुण्याला विद्यार्थी, व्यावसायिक आदी लाखों प्रवासी नियमित ये-जा करीत असतात, त्यामुळे नांदेड- पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या आधीच सतत फुल्ल असतात. तरीही या मार्गावरील गाड्या बंद करण्याचा खेळ सातत्याने खेळला जात असतो.
निझामाबाद-पुणे-निझामाबाद च्या तीन फेऱ्या आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील ट्राफिक ब्लॉकमुळे निझामाबाद-पुणे-निझामाबाद च्या तीन फेऱ्या आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे. ऐन सणासुदीच्या काळात या रेल्वे गाड्या रद्द करण्याऐवजी इतर पर्यायी मार्गाने त्या चालविण्याच्या पर्यायांवर विचार का टाळण्यात येत आहे, ऐन सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स मालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वाढवलेले असते, त्याला आणखी बळ देण्याचा हा प्रकार नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
◆ रद्द करण्यात आलेल्या रेल्वे आणि तारखा पुढील प्रमाणे–
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻