Tuesday, March 28, 2023

संत सेवालाल महाराज मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर नांदेड शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मिरवणूक विनापरवानगी बेकायदेशीररित्या काढून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश धुडकावल्याप्रकरणी मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर नांदेड शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर मार्गे भाग्यनगर कमान ते सेवालाल महाराज हनुमान मंदिर गड अशी संत सेवालाल महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान विनापरवाना बेकायदेशीररित्या आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून तसेच कोविड साथरोग संदर्भाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या नियमावलीचे आदेश सुरू असताना सुद्धा अंतर न बाळगता, चेहऱ्यावर मास्क न वापरता मिरवणूक काढल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस अंमलदार गोविंद मंगनाळे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात अखिल राठोड, संकेत चव्हाण, जीवन राठोड, आकाश राठोड यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अमलदार जाधव करत आहेत.

माहूर पोलीस ठाण्यातही गुन्हा
दिनेश जाधव, बजरंग जाधव, रोहन जाधव, करण पवार, बजरंग राठोड, अभिषेक परळकर, मनोज चव्हाण, दिनेश जाधव, दशरथ पवार, आकाश मोहन, विक्रम पवार, आकाश जाधव, अर्जुन राठोड, राहुल राठोड, जुगल चव्हाण, अतिष राठोड, अभय राठोड, ईश्वर चव्हाण, मंगल जाधव, संजय चव्हाण, पवन राठोड, राजू राठोड यांच्यासह इतर पन्नास ते साठ जणांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस अमलदार विजय आडे करत आहेत.

हदगाव पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल
संत सेवालाल महाराज यांची जयंती मिरवणूक विनापरवानगी काढून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस हवालदार विश्‍वनाथ हंबर्डे यांच्या फिर्यादीवरून रविकुमार चव्हाण, आकाश राठोड, विशाल जाधव, सुधाकर आडे यांच्यासह 75 ते 100 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच याच पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गंगाधर कदम, गजानन कदम, सिताराम कदम, तुकाराम कदम, माधव कदम, अशोक कदम, प्रल्हाद सूर्यवंशी, ज्योती वाठोरे, संतोष सूर्यवंशी सर्व राहणार फळी, हडसणी, ल्याहरी यांच्याविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,754FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!