Wednesday, July 24, 2024

‘सप्तफेरे’च्या विविध पुरस्कारांचा ३० डिसेंबर रोजी वितरण सोहळा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पत्रकार शशिकांत पाटील, डॉ.गंगाधर परगे, कवी भारत सातपुते यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कार

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या ०९ वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदविणाऱ्या सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर झालेले पुरस्कार वितरण सोहळा ३० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, औसाचे भाजप आ. अभिमन्यू पवार, शिक्षक आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

सप्तफेरे वधूवर सुचक केंद्रातर्फे गेल्या काही वर्षापासुन समाजातील गोरगरीब-गरजु लोकांना मदत करणार्‍या, सामाजिक -पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित केलं जातं. ज्यात यावर्षी पत्रकार रत्न म्हणून झी २४ तासचे लातूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील, आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. गंगाधर परगे, डॉ. मोनिका पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. आशुतोष वैरागे, सय्यद जुबेर यांना कोरोना योद्धा पुरस्कार, कवी रत्न म्हणून भारत सातपुते, नृत्य कलारत्न कु. सृष्टी जगताप, माहिती तंत्र शिक्षकरत्न उदय देशपांडे, समाजरत्न दत्तात्रय माळी, साहित्य रत्न म्हणून धनंजय गुडसूरकर, तंत्रस्नेही शिक्षण रत्न उमेश खोसे, समाजरत्न म्हणून दिशा प्रतिष्ठान, रयत प्रतिष्ठान, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ-महाराष्ट्र तसेच वृक्षमित्र-संवर्धन रत्न म्हणून ग्रीन लातूर वृक्ष टीम यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती सप्तफेरे वधू वर सूचक केंद्राचे संस्थापक संजय राजुळे यांनी दिली आहे. लातूरच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉल मध्ये गुरुवार, दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ०५ वा. हा सोहळा पार पडणार आहे. वरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात येणार आहे.

राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, औसाचे भाजप आ. अभिमन्यू पवार, शिक्षक आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, डॉ.धर्मवीर भारती, नागनाथ गिते, स्टार प्रवाह वरील एक टप्पा आऊट फेम बालाजी सुळ, चंद्रकांत अण्णा वैजापुरे, विवेकानंद सलगरे, पत्रकार नरसिंह घोणे आदिंची उपस्थिती राहणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  सप्तफेरे वधुवर सुचक केंद्राचे संस्थापक संजय राजुळे, संचालक माधव तरगुडे यांनी केले आहे.

सप्तफेरे वधूवर सुचक केंद्रातर्फे गेल्या काही वर्षापासुन समाजातील गोरगरीब-गरजु लोकांना मदत करणार्‍या, सामाजिक -पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित केलं जातं. ज्यात यावर्षी पत्रकार रत्न म्हणून झी २४ तासचे लातूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील, आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. गंगाधर परगे, डॉ. मोनिका पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. आशुतोष वैरागे, सय्यद जुबेर यांना कोरोना योद्धा पुरस्कार, कवी रत्न म्हणून भारत सातपुते, नृत्य कलारत्न कु. सृष्टी जगताप, माहिती तंत्र शिक्षकरत्न उदय देशपांडे, समाजरत्न दत्तात्रय माळी, साहित्य रत्न म्हणून धनंजय गुडसूरकर, समाजरत्न म्हणून दिशा प्रतिष्ठान, रयत प्रतिष्ठान, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ-महाराष्ट्र तसेच वृक्षमित्र-संवर्धन रत्न म्हणून ग्रीन लातूर वृक्ष टीम यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती सप्तफेरे वधू वर सूचक केंद्राचे संस्थापक संजय राजुळे यांनी दिली आहे. लातूरच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉल मध्ये गुरुवार, दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ०५ वा. हा सोहळा पार पडणार आहे. वरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात येणार आहे.

राज्याचे पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, औसाचे भाजप आ. अभिमन्यू पवार, शिक्षक आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, डॉ.धर्मवीर भारती, नागनाथ गिते, स्टार प्रवाह वरील एक टप्पा आऊट फेम बालाजी सुळ, चंद्रकांत अण्णा वैजापुरे, विवेकानंद सलगरे, पत्रकार नरसिंह घोणे आदिंची उपस्थिती राहणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  सप्तफेरे वधुवर सुचक केंद्राचे संस्थापक संजय राजुळे, संचालक माधव तरगुडे यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!