Saturday, July 27, 2024

साडेसहा लाख रुपयांची लाच घेताना बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यास रंगेहाथ अटक, घरातून 73 लाख रुपये जप्त; नांदेडच्या एसीबी पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजपूत व त्यांचा एक कर्मचारी अशा दोन जणांना साडेसहा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. बुधवार दि. एक नोव्हेंबरच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर यानंतर गजेंद्र राजपूत यांच्या घरातून तब्बल 73 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) आणि विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3) यांनी लाचेची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने दि.३१ आक्टोबर रोजी याबाबत तक्रार दिली. वरील कामासाठी साडेसात लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. दि.31आक्टोबर व दि.1 नोव्हेंबर रोजी पडताळणी ही मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 6 लाख 40 हजार रुपये लाच त्यांनी स्विकारली.

यातील तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड ता. हदगाव, जि. नांदेड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले होते. सदर कामाच्या निवीदा स्विकृतीच्या शिफारसीसाठी यातील तक्रारदार हे आलोसे गजेंद्र राजपुत, (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड) यांना भेटले असता, त्यांनी मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण 14 कोटी 10 लाख रूपयांचे अर्धा टक्के रक्कम 7 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता, नांदेड यांच्याकडे कामाची शिफारस करणार अन्यथा नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत टेबलचे लिपिक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे व त्यांचेसोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25 हजार रूपये असे एकुण 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेपोटी हे पैसे देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.

त्यानंतर दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी व दि. 01 नोव्हेंबर 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत; काही तरी कमी करा अशी विनंती केली असता,अधीक्षक अभियंता राजपुत यांनी तडजोडीअंती सहा लाख रूपयांची पंचासमक्ष मागणी केली. हे सहा लाख रूपये संबंधित लिपीक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपुत साहेबांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेन्डरचे प्रत्येकी 20 हजार रुपये असे एकुण 6 लाख 40 हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचासमक्ष होकार दर्शविला.

त्यानंतर दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेडचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून 6 लाख गजेंद्र हिरालाल राजपुत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) यांच्यासाठी व आलोसे विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे 40 हजार रूपये असे एकुण 6 लाख 40 हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यानंतर अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांचे कार्यालय व घराची झडती घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचासमक्ष एकूण 72 लाख 91 हजार 490 रुपये जप्त केले आहेत.

या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.

ही सापळा कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथकाचे अनिल कटके, पोलीस उप अधीक्षक, गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, पोह/ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, चापोह/शेख अकबर, पोना/राजेश राठोड, पोकॉ/अरशद खान, ईश्वर जाधव, चापोना/गजानन राउत, प्रकाश मामुलवार, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या पथकाने केली. पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!