ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ दिव्यांग बालकांसाठी असलेल्या उमंग सेंटरलाही राज्यपालांनी दिली भेट
लातूर – सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे. सदर काम अधिक मोठ्या प्रमाणावर करावे जेणे करून राज्याला आणि देशाला पथदर्शक होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. ते लातूरमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते.
लातूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल,अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे , जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.सी. शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उमंगचे डॉ. उटगे यांच्यासह विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, लातूर जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात होते. त्याची प्रक्रिया पण येथे होते हे कौतुकास्पद आहे. काळं सोयाबीन हे स्वादासाठी आणि प्रोटीनयुक्त असतात. काळा सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा असे ही यावेळी राज्यपाल म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सादरीकरणाद्वारे लातूर जिल्ह्यातील पर्यटन, सिंचन, इतिहासिक स्थळे, पर्जन्यमान, लोकसंख्या आणि जिल्ह्याची एकूण पाणी पातळीची माहिती दिली.
दरम्यान लातूर दौरा आटोपण्यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लातूरच्या उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर भेट दिली. यावेळी त्यांनी सेंटर उभं केल्याद्दल कौतुक करून हे सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालविण्यासाठी व दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. या सेंटरमध्ये दिव्यांग मुलांसाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्ली इंटर्वेशन, ऑक्युपेसनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजियोथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे व उमंग सेंटर मधील थेरपिस्ट तसेच कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. त्यांच्या बरोबर फोटो काढून घेतले. उपचार सुरु असलेल्या तिथल्या बालकांना उचलून घेऊन कौतुकही केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻