ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि.नांदेड)- तालुक्यातील शेलगाव येथील महिलेचे दि.१३ बुधवारी रोजी सकाळी वाजता निधन झाले. पण स्मशानभूमीत चोहोबाजूंनी पाणीच पाणी झाल्यामुळे महिलेवर अखेत नाईलाजाने कामठा-पिंपळगाव रस्त्यावर अत्यंस्कार करण्यात आले. एक ते दीड फुट पाण्यातून वाट काढत बुधवारी हे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित बातम्या 👇🏻
माणूस जिवंत असेपर्यंत अनेक यातना भोगत असतो. मरण म्हणजे या सर्व यातनातून सुटका, असे मानले जाते. मात्र अर्धापूर तालुक्यातील शेवगाव येथील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे. शेलगाव ता.अर्धापुर येथील कमलबाई मारोती राजेगोरे (वय ५० वर्ष) यांचे निधन झाले. शेलगाव बु व खु या दोन्ही गावांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा बसतो. आताही तब्बल २४ तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
संबंधित बातम्या 👇🏻
गावाला पुराने वेढा घातला असल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कार करणे अवघड होऊन बसले आहे. याच समस्येमुळे काल गावातील एका महिलेचा अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागला. निकटवर्ती नातेवाईक अंत्यसंस्कारापासून मुकले. अत्यंस्कार करण्यासाठी दीड फुट पाण्यातुन मार्ग काढीत शेताजवळ नेऊन रस्त्यावर अत्यंस्कार करण्यात आले. मयत कमलबाई मारोतराव राजेगोरे यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. त्या भाजयुमोचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मुजांजी राजेगोरे यांच्या आई होत. या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उध्दवराव राजेगोरे म्हणाले की, रुग्णांसह शालेय विद्यार्थ्यांना पुराचा मोठा फटका बसत आहे. शासनाने शेलगाव बु.व खु. येथील नदीचे रुंदीकरण करावे व नदीवर मोठा पूल उभारावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻