Monday, October 14, 2024

‘स्वारातीम’ विद्यापीठाअंतर्गत हिवाळी-२०२१ परीक्षांचे वेळापत्रक व पद्धती जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार

नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी-२०२१ परीक्षा व त्याबद्दलची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला आहे. कोविड-१९ व ओमिक्रोन या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सदर परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 

पदवी अभ्यासक्रम परीक्षा या ८ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ ते ३० मार्च २०२२ दरम्यान होणार आहेत. असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवी एन सरोदे यांनी कळविले आहे.

यापूर्वी विद्यापीठाने उन्हाळी २०२१ परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्या आहेत. त्याच पद्धतीने हिवाळी २०२१ परीक्षा घेण्यात येणार आहेत. पूर्वीप्रमाणेच चारही जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षार्थी कडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेसंदर्भात समंतीपत्र परीक्षा आवेदनपत्र भरतांना भरून घ्यायचे आहेत. या समंतीपत्रानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा देता येतील.

ऑनलाइन पद्धतीनुसार विद्यार्थी घरी बसून मोबाईल द्वारे परीक्षा देऊ शकतात. जो मोबाईल क्रमांक अवेदनपत्रा वर दिला आहे तोच मोबाईल क्रमांक परीक्षा देताना वापरता येणार आहे. एका मोबाईलवर एकाच विद्यार्थ्याला परीक्षा देता येईल. त्याचा गैरवापर झाल्यास विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा नियमावलीचे पालन करून हिवाळी २०२१ परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहे.

सर्व पदवी व पदव्युत्तर परीक्षा या ह्या बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नपत्रिकेद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका ही ४० प्रश्नांची व ४० गुणांची असणार आहे.  प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात येईल. सदर परीक्षेचा कालावधी एक तासाचा आहे असणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका ४० गुणांची असेल व प्रश्नपत्रिकेमध्ये ५० बहुपर्यायी ( एमसीक्यू) प्रश्न असणार आहेत. सदर परीक्षेचा कालावधी हा एका तासाचा राहणार आहे. या दोन्ही पदवी व पदव्युत्तर परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. या सर्व हिवाळी २०२१ पदवी, पदव्युत्तर व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सविस्तर वेळापत्रक टप्प्याटप्प्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करताना सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्यात याव्यात. असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवी सरोदे यांनी कळविले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!