Saturday, July 27, 2024

हदगावचे कॉंग्रेस नेते जाकेर चाऊस यांचा शिवसेनेत प्रवेश

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हदगांव- पूर्वाश्रमीचे भारिप-बहुजन महासंघ, काँंग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे हदगांव तालुक्यातील नेते जाकेर चाऊस यांनी गुरुवारी, दि. २३ डिसेंबर रोजी शिवसेना भवन मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना उपनेते विश्वनाथजी नेरुरकर यांच्या हस्ते आज शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख जाकेर चाऊस यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शेख मुबिन शेख यासिन, बाळासाहेब वसंतराव माळोदे, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष शिवा चंदेल, शिवसैनिक दिनेश श्रीरामवार यांचीही उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!