Saturday, November 9, 2024

हळदी पेमेंटच्या मुद्द्यावरून सोमवारी आडत्यांनी पाळला कडकडीत बंद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

उद्या सकाळी ११ वाजता असोसिएशनच्या इमारतीत बैठकीचे आयोजन

नांदेड– कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या हळदीचे पेमेंट वेळेत मिळत नसल्याने शेतकरी आणि आडत्यांमध्ये वाद होत आहेत. यास खरेदीदार कारणीभूत असल्याचा आरोप करत आडत्यांनी आज सोमवारी दिनांक ३ जानेवारी रोजी व्यवहार कडकडीतपणे बंद ठेवले. यामुळे नेहमी गजबजलेला नविन मोंढा परिसर दिवसभर सुनसान होता. व्यापाऱ्यांनी फेरी काढून दुकाने बंद केले. या प्रकरणात पुढील दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता असोसिएशनच्या इमारतीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या शेतमालाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात २४ तासात जमा करण्याचा नियम आहे. परंतु कोणीही व्यापारी, खरेदीदार या नियमांचे पालन करत नाही.

हळदीचे पेमेन्ट वेळेत मिळेना

आडत्यांकडून शेतकऱ्यांना पेमेंट देण्यास विलंब होत आहे. परिणामी शेतकरी आणि आडत्यात वाद उदभवू लागल्याने शनिवारी १ जानेवारी रोजी दुपारी दि ग्रेन मर्चंट असोसिएशनने बाजार समितीच्या सचिवांची भेट घेवून आपले गान्हाणे मांडले. तसेच सोमवारपासून सर्व व्यवहार, वजन काटे, बीट बंद ठेवण्याचा निर्णय घेत तसे निवेदन दिले होते. यावेळी प्रल्हाद इंगोले, विठ्ठल देशमुख, अनिल मंत्री, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी भायेगावकर, बद्रीनारायण मंत्री विजयकुमार पोकर्णा, नवनाथराव पाटील, गोपाल शर्मा, राजीव पालदेवार, चंदुसेठ नागठाणे, मधुकर देशमुख, दौलतराव भालेराव, संतोष रामोळे, भीमराव देशमुख, दिपक मुरक्या, अनिल जिंके, निलेश पल्लेवाड, राम राजेगोरे आदींची उपस्थिती होती.

२४ तासांत शेतकऱ्यांना पेमेन्ट देणे गरजेचे

हळदीचे पैसे २४ तासांत देणे नियमाने गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. त्यात पंधरा दिवसाला १ रुपया कपात करून पेमेन्ट करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेतला होता. परंतु हा निर्णयही खरेदीदारांकडून पाळला जात नाही. पेमेन्ट मिळत नसल्याचे आडत्यांचे म्हणणे खरेदीदारांनी पंधरा दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजघडीला खरेदीदार दीड ते दोन महिन्यांनी पेमेंट करत आहेत. त्यामुळे शेतकरी आडत्यात वाद होत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!