ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई/ नांदेड: हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी काल मुंबईसह राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नांदेडमध्येही महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
आज मंगळवारी सकाळी 11 वाजता हिंदुस्थानी भाऊला कोर्टात हजर केले गेले. तेव्हा न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबई, नांदेडसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मुंबईच्या धारावी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नांदेडमध्येही…
काल सोमवारी मुंबईत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, तसेच रस्त्यावरील गाड्या आणि बसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. मुलांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. मुंबईसह राज्याच्या विविध शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. नांदेडमध्येही महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हे विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले.
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करीत आहेत, ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊच म्हणणं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
विकास फाटकचं म्हणणं काय…
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक काल म्हणाला होता की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं.”
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे हिंदुस्थान भाऊने व्हिडीओत म्हटले होते.
विकास फाठकच्या चिथावणीखोर व्हिडीओनंतर विद्यार्थी एकवटले यावेळी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलं आहे. विद्यार्थ्यांना भडकवून पद्धतशीर आंदोलन केली जात आहेत. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी सर्व करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻