Saturday, March 25, 2023

हिमायतनगरजवळ भीषण अपघात; बिहारचे पाच मजूर ठार, चार गंभीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिमायतनगर (जिल्हा नांदेड)- हिमायतनगर तालुक्यातील करंजी फाटा येथे आज शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ट्रक आणि आयचर टेम्पोचा भीषण अपघात झाला आज. यात बिहारचे पाच मजूर ठार झाले आहेत तर चार जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे.

बिहार राज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच कामगारावर हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्याजवळ काळाने घाला घातला. मयत व जखमी सर्व रेल्वेच्या कामासाठी हिमायतनगर परिसरात वास्तव्यास होते. आज रात्री आठच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना त्यांच्या आयचर टेम्पोला सिमेंट नेणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत आयचरमधील पाच कामगार जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळाला पोलीस निरीक्षक भूशनर यांच्यासह आदी पोलीस अधिकाऱ्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,748FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!