Tuesday, December 3, 2024

हिमायतनगर जवळ रेल्वेमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ आई- बाळ सुखरूप

हिमायतनगर (जि. नांदेड)- रेल्वे गाड्यांमधून प्रवास करतेवेळी महिलांनी नवजात बालकांना जन्म दिल्याच्या घटना आपण वाचल्या आहेत. अशीच एक घटना भोकरहुन प्रवास करणाऱ्या महिलेसोबत हिमायतनगरजवळ घडली आहे. सदर महिलेने परळी ते आदिलाबाद जाणाऱ्या रेल्वेत आज दि.२७ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सदर महिलेने पाऊणे दोन किलो वजन असलेल्या एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. नाजुकाबाई अनिल कवडेकर वय ३० वर्ष रा.बटाळा ता.भोकर ही महिला आपल्या पतीसह २ मुलींना घेऊन पॅसेंजर रेल्वेने भोकरहून बोधडी येथे माहेरला निघाली होती. थेरबन स्थानकसमोर रेल्वे गाडी येताच गर्भवती महिलेला लेबर पेन म्हणजे प्रसूती कळा जाणवू लागल्या. याच डब्ब्यात इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रदीप शिंदे देखील प्रवास करत होते. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ अन्य पॅसेंजर महिलांच्या मदतीने सदर महिलेची रेल्वेतच डिलेव्हरी होऊ दिली. यात गर्भवती महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला.

परळी ते आदिलाबाद जाणारी रेल्वे हिमायतनगर येथील स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर येताच नागरिकांच्या मदतीने प्रसूत झालेली महिला, नवजात बालकास हिमायतनगर रेल्वे स्थानकावर उतरून ऑटोने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव होत असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद मामीडवार यांच्यासह परिचारिका व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसूती झालेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केला. आता आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तंदुरुस्त बाळाला जन्म दिल्याने बाळाची आई नाजुकाबाई आणि वडील अनिल दोघांनाही आनंदीत झालेले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!