Tuesday, February 27, 2024

नांदेडमधील हिमालया अकॅडमीच्या गिर्यारोहकांनी सर केले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून केले नववर्षाचे स्वागत

नांदेड– येथील हिमालया अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स अँड अॅडवेंचर द्वारा  नवीन वर्षानिमित्त आयोजित कळसुबाई शिखर आरोहण मोहिमेत नांदेडमधील २० गिर्यारोहकांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. हिमालया अकॅडमीचे संचालक ओमेश पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोहिमेमध्ये नांदेड मधील डॉक्टर्स, शिक्षक, व्यावसायिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

कळसुबाई हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर इतकी आहे. या ट्रेकला जाणाऱ्या गिर्यारोहकांची चालण्याची क्षमता चांगली असावी लागते तरच ते शेवटपर्यंत टिकू शकतात. सकाळी ९ वा. हिमालया टीमच्या सदस्यांनी शिखर चढायला सुरुवात केली. चढाईचा शेवटचा टप्पा शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. हे सर्व टप्पे पार करून सर्वच्या सर्व टीम शिखराच्या माथ्यावर असलेल्या आई कळसुबाई देवीच्या मंदिरा पर्यंत पोहोचली व तेथे तिरंगा ध्वज फडकवून आनंद साजरा केला.

शिखराच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगा, भंडारदरा धरण,रतनगड, कात्राबाईचे जंगल व इतर दूरवरचे डोंगर परिसर, गावे पाहायला मिळतात. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून सर्व टीमने खाली उतरण्यास सुरुवात केलीच होती की पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हिवाळ्यात पावसाळ्याचा आनंद घेत भिजत भिजत सर्व टीम सायंकाळी साडेपाच वाजता पायथ्याशी असलेल्या बारी गावात पोहोचली. अशाप्रकारे टीम मधील सर्व सदस्यांनी नववर्ष स्वागताचा जल्लोष आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून येणारे वर्ष असेच जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याचा संकल्प केला.

या शिखर मोहिमेत डॉ.अनिल देवसरकर, डॉ. रामचंद्र हेंडगे, डॉ.गजानन पवार, डॉ.गजानन कर्हाळे, डॉ.सतिश गायकवाड, डॉ.सम्राज्ञी पाध्ये, प्रल्हाद इंगोले, अनुराधा इंगोले, संतोष दंडे, साईनाथ माळवटकर, कपिल टाक, निलेश जामकर, आदित्य माने, पुष्कर फलटणकर, प्रतिक्षा इंगोले, अश्विनी पांचाळ, बेबी नातेवार, अजित देशमुख, प्रशांत कदम, प्रविण कदम हे गिर्यारोहक सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी नांदेडहून निघताना माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, डॉ.उमेश भालेराव, सौ.कविता जोशी शिरपुरकर, लक्ष्मण मदने या पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत बारी गावाच्या दिशेने टीम रवाना झाली होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!