Thursday, April 25, 2024

१०, २९ वरून आज ४५ ! नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  सोमवारी १०, मंगळवारी २९ वरून आज बुधवारी ४५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या 1 हजार 32 अहवालापैकी 45 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 646 एवढी झाली असून यातील 87 हजार 888 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 103 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 36, बिलोली 1, हदगाव 1, कंधार 2, अकोला 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, देगलूर 1, मुखेड 1, नायगाव 1 असे एकुण 45 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 103 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 88,  खाजगी रुग्णालय 4 अशा एकुण 103 व्यक्ती उपचार घेत आहेत.
  
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 1 हजार 124
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 96 हजार 887
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 646
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 888
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.9 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-103
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
 
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!