Sunday, May 19, 2024

अवैध पिस्टल विक्री: नांदेडमध्ये पोलिसांनी जप्त केल्या 7 पिस्टल आणि 116 जिवंत काडतूसं; चार आरोपींना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेल्या तब्बल सात पिस्टल आणि 116 जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही वाघी ते नाळेश्वर रस्त्यावरील आर. टी. ओ. ऑफीसजवळ करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सात पिस्तूल आणि 116 जिवंत काडतुसं जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दि. २ आक्टोबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाघी ते नाळेश्वर जाणारे रोडवरील आर. टी. ओ. ऑफीसजवळ काही इसम पिस्टल खरेदी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, सपोनी रवि वाहुळे, फौजदार दत्तात्रय काळे व पोलीस अंमलदारांसह नाळेश्वर जाणाऱ्या रोडवरील आर. टी. ओ. ऑफीसजवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी कमलेश ऊर्फ आशु पाटील बालाजी लिंबापुरे (वय 23 वर्ष, रा. गॅस गोडाऊनजवळ वसरणीरोड, नांदेड), बलबिरसिंघ ऊर्फ शेरा प्रतापसिंघ जाधव (वय 21 वर्ष, रा. गुरु रामदास यात्री निवास, हिंगोली गेट, नांदेड), शेख शाहबाज शेख शकील (वय 23 वर्ष, रा. दुध डेअरी, रहीमपुर, नांदेड) व शामसिंघ ऊर्फ शाम्या गेंदासिंघ मठवाले (वय 23 वर्ष, रा. गुरुव्दारा गेट नं.2, तहसिल ऑफीसच्या मागे, नांदेड) यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून बेकायदेशीरीत्या मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्रीसाठी आणलेले सात पिस्टल (अग्नीशस्त्र) व 116 जिवंत काडतूस असा एकूण तीन लाख तीन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर आरोपीतांनी हैद्राबाद येथे आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना दोघेही रा. नांदेड यांच्यासह नांदेड येथे मोठया प्रमाणात गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) पुरविण्याचे कटकारस्थान रचले होते. त्यासाठी आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या तिवाना हे दोघेही पैसे पुरवित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, सपोनि  रवि वाहुळे, सपोनि पांडूरंग माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ  गुंडेराव करले, पोहेकॉ बालाजी तेलंग, पोना दिपक पवार, पोना संजीव जिंकलवाड, पोको बालाजी यादगीरवाड, पोकॉ विलास कदम, पोकों तानाजी येळगे पोकों गजानन बयनवाड पोकॉ देवा चव्हाण, पोकों रणधिरसिंह राजबन्सी, पोकों ज्वालासिंघ बावरी, चापोकॉ हनुमान ठाकूर, चापोकॉ शेख कलीम, चापोकॉ बालाजी मुंडे व सायबर सेलचे पोहेकॉ दिपक ओढणे व पोहेकॉ राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!