Friday, April 19, 2024

ऑनर किलिंग प्रकरण: पोलिसांना एका नाल्यात मुलीची हाडं सापडली, डीएनए टेस्ट होणार; आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईकांनी मृतदेह जाळून राखही फेकली होती नाल्यात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लिंबगाव (जि. नांदेड) – धक्कादायक ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांना आरोपींच्या शेताजवळील एका नाल्यात मुलीची हाडं सापडली आहेत. या हाडांची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. आरोपी आई- वडील आणि इतर नातेवाईकांनी मुलीचा खून करून नंतर तिचा मृतदेह जाळून टाकला होता. एवढंच नव्हे तर तिची राख नाल्यात फेकून देण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांना सापडलेली मुलीची हाडं हे तपासात मोठे यश मानले जात आहे.

नात्यातील व गावातील एका तरुणासोबत प्रेम संबंधांमुळे झालेली मुलीच्या दोन सोयरीकी मोडल्या गेल्या. यामुळे आपली गावात बदनामी होऊ नये म्हणून वडील, काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ अशा पाच जणांनी भावी डॉक्टर शुभांगी जोगदंड (वय २३) हिचा २२ जानेवारीच्या रात्री ओढणींने गळा आवळून खून केला. यावेळी मारेकरी वडील, काका आणि मामा यांनी खुनापूर्वी दारु रिचवली होती. खुनानंतर पुरावा नष्‍ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात जाळून टाकला. या घटनेचा कोणालाही संशय येऊ नये, म्हणून नेहमीसारखेच गावात राहून आपली दिनचर्या करत होते. आई- वडिल दुचाकीवर दररोज शेतात जात- येत होते, तर भाऊ नित्यनेमाने गावातील ग्रामदैवताच्या दर्शनला जात होता.

नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल हे गाव लिंबगाव पोलीस ठाण्‍यापासून ८ किलो मीटरवर अंतरावर आहे. अडीच हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील बहुतांश जणांचे उपजिवीकेचे साधन हे शेती व्यवसाय आहे. जनार्दन लिंबाजी जोगदंड हे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तिला गावातच देण्यात आले आहे. तर शुभांगी नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत होती. शुभांगी फारशी गावी येत नव्हती. तसेच जोगदंड कुटुंबियही फारसे कोणात मिसळत नव्हते, असे ग्रामस्थांमधून सांगण्यात आले.

मागील दीड वर्षापासून शुभांगीचे नात्यातील एका तरूणांसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तोही गावात रहात होता. नांदेड येथे एका सीएकडे नोकरीस होता. या दोघांच्या प्रेमाला जोगदंड कुटुंबियांचा विरोध होता. शुभांगीची नात्यातील एका मुलासोबत जुळलेली सोयरीकही तिच्या प्रियकाराने मोडली होती, असे सांगण्यात येते. यापूर्वीही तिची सोयरीक मोडली होती. यामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे असे जनार्दन लिंबाजी जोगदंड यांना वाटत होते.

त्यामुळेच त्यांनी शुभांगीचे काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ यांनी दि. २२ जानेवारीच्या रात्री घरात ओढणीने शुभांगीचा गळा आवळून खून केला. हा प्रकार कोणालाही लक्षात येऊ नये म्हणून मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात नेऊन जाळला होता. यादिवशी हे पाचही जण शेतातच मुक्कामी होते. उजाडल्यानंतर दुस-या दिवशी दि. २३ जानेवारीला तिची राख शेतापासून तीन ते चार किलोमीटर असंतरावर असलेल्या हिवरा शिवारातील एका नाल्यात टाकली. आपल्या वागण्यातूनही कोणाला संशय येऊन नये म्हणून हे सर्वजण गावात नेहमीप्रमाणेच रहात होते. त्यांची दुसरी मुलगी गावात रहात असूनही तिलाही या घटनेची साधी कुणकुणही लागली नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

गेल्या तीन- चार दिवसांपासून शुभांगी गावात दिसत नसल्याची आणि शंकास्पद गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता शुभांगीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यामध्ये पोलिसांनी शुभांगीचे आई-वडील, चुलत भाऊ, मामा यांच्यासह पाच जणांना अटक केली. लिंबगाव पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर या नातेवाईकांच्या जबाबातून अखेर हत्या झाल्याचं समोर आलं.

आता पोलिसांना तपासादरम्यान आरोपींच्या शेतात मुलीची हाडं सापडली असून पोलिसांना सापडलेली मुलीची ही हाडं हे या खुनाच्या तपासातील मोठे यश मानले जात आहे. खुनाचा कुठलाही पुरावा राहू नये म्हणून मुळेच्या नातेवाईकांनी राखही शिल्लक ठेवली नव्हती, अशात पोलिसांनी एका नाल्यातून, नदीच्या ओढ्यातून हाडं जप्त केली आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!