ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून बँक खात्यातून ऑनलाइन दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी वजिराबाद आणि मुखेड पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकरविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत महानगरपालिका परिसरात अनिल वसंत जोशी राहणार कुंभार टेकडी, होळी, नांदेड हे थांबले असता त्यांना नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. एटीएम कार्डचे संरक्षण विमा बंद आहे असे सांगून मोबाईलचा वापर केल्याने ओटीपी नंबर मागितला. ओटीपी क्रमांक मिळताच समोरच्या व्यक्तीने अनिल जोशी यांच्या खात्यातून 67 हजार 165 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. खात्यातून रक्कम वजा होताच अनिल जोशी यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ वजिराबाद पोलिस ठाणे गाठून संबंधित बँकेशी संपर्क केला. चौकशीअंती 18 फेब्रुवारीच्या रात्री वजिराबाद पोलिस ठाण्यात अनिल जोशी यांच्या फिर्यादीवरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक श्री निकम करत आहेत.
तर दुसर्या घटनेत मुखेड येथील तेलीपेठ गल्ली भागात राहणाऱ्या उषा रवींद्र संबुटवाड यांनाही मी बँकेतून बोलत आहो असे सांगून त्यांच्याही खात्यातील वीस हजार रुपये अज्ञात हॅकरणे काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना दि.26 नोव्हेंबर 2018 मुखेड येथे घडली होती. याप्रकरणी तब्बल तीन वर्षांनी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्री गोबाडे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻