ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भाविकांनी लाभ घेण्याचे खा. सुधाकर शृंगारे यांचे आवाहन
लातूर : कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आणि भाविक प्रचंड मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. या भाविकांसाठी लातूर ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी पाच दिवस सोडण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूरचे भाजप खा.सुधाकर शृंगारे यांनी केलं आहे.
कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक पंढरपूरला जात असतात. लातूर जिल्ह्यासह शेजारील नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातून पंढरपूरकडे ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार लातूर-पंढरपूर रेल्वेगाडी क्रमांक-01419, ही गाडी 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर,7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता लातूर स्टेशन वरून सुटेल. पंढरपूर येथे दुपारी 12.25 वाजता पोहचेल. तर पंढरपूर येथून लातूर साठी विशेष दुसरी रेल्वेगाडी क्रमांक 01420 ही 14.30 वाजता सुटेल. 1,2,4,7 आणि 8 नोव्हेंबर रोजी सोडण्यात आली आहे.
लातूर, हरंगुळ,औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, मोडलिंबआणि पंढरपूर रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. या व्यतिरिक्त लातूर रेल्वे स्टेशनवरून आदीलाबाद-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र लातूर-पंढरपूर आणि पंढरपूर-लातूर रेल्वेच्या सर्वात जास्त म्हणजे पाच फेऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या गाडीचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻