Thursday, April 25, 2024

नांदेडमध्ये दोन युवकांकडे आढळले अवैध पिस्तुल; 2 गावठी पिस्तुलांसह दोन्ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- नांदेडमध्ये दोन युवकांकडे अवैध पिस्तुलं आढळून आली आहेत. या दोन गावठी पिस्तुलांसह दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

शहर व जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढुन त्यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पथके तयार केली होती. दिनांक 31 आक्टोबर रोजी व्दारकादास चिखलीकर यांना नांदेड शहरातील तानाजीनगर येथे दोन व्यक्ती स्वतः जवळ अवैध पिस्टल बाळगत असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरिष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे अधिकारी व अंमलदार तानाजीनगर, नांदेड येथे रवाना केले.

स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांनी आकाश लुळे यांचे घरासमोरील रोडवर, तानाजीनगर, नांदेड येथे जावुन आरोपी  आकाश गोविंदराव लुळे (वय 20) व्यवसाय बेरोजगार रा. तानाजीनगर, नांदेड आणि राम व्यंकटी पल्लेवाड (वय 23) व्यवसाय बेरोजगार रा. देगांव ता. नायगांव जि. नांदेड यांना पकडुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला लावलेले एक एक पिस्टल व एक-एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदरचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस किंमती 40 हजार 800 रुपयाचे दोन पंचासमक्ष जप्त करुन सपोनि पी. व्ही. माने यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक  व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग माने, पोउपनि जसवंतसिंघ शाहु, सपोउपनि मारोती तेलंग, पोह सखाराम नवघरे, पोना  अफजल पठाण, विठल शेळके, तानाजी येळगे, राजु सिटीकर, दिपक ओढणे, महेश बडगु यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!