Saturday, November 23, 2024

गुन्हा दाखल कराल तर आत्महत्या करेन; वाळूमाफियांची व्हाट्सअपवरून धमकी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नायगाव तालुक्यातील घटना, गुन्हा दाखल

नांदेड/ नायगाव– कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनूर शिवारातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदेशीररीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर या दोघांतील एकाने आमच्यावर गुन्हा दाखल कराल किंवा पंचनामा करून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे द्याल तर औषध पिऊन आत्महत्या करीन असा धमकीवजा संदेश कारवाई करणाऱ्या तलाठी यांच्या व्हाट्सअपवर पाठविल्याने येथे एकच खळबळ उडाली. वाळूमाफियांनी दिलेल्या या धमकीप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनूर तालुका नायगाव आणि अंतरगाव तालुका नायगाव येथील गजानन लक्ष्‍मण शिंदे व आनंदा प्रकाश शिंदे या दोघांनी संगणमत करून विनापरवाना गोदावरी नदी पात्रालगत शेत गट नंबर 328 मधील मनुर शिवारातून वाळूचे विनापरवाना उत्खनन करण्यासाठी कच्चा रस्ता तयार करून तेथून वाळू उपसा करण्यासाठी एक मशीन तयार ठेवली होती. ही माहिती अंतरगाव सज्जाचे तलाठी काशिनाथ लांडगे यांना मिळाली. नायगाव तहसीलदार यांच्या आदेशावरून दि.३ डिसेंबरच्या सकाळी ११ च्या सुमारास मनूर शिवारात होणारा वाळू उपसा थांबविण्यासाठी तेथे ते आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. पथकाने तेथील एका अंशी हजार रुपये किमतीची मशीन जप्त केली. या मशिनचा पंचनामा करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे द्याल तर मी आत्महत्या करेन असे म्हणून वाळू माफिया तेथून निघून गेले. एवढेच नाही तर तलाठी काशिनाथ लांडगे यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर 8459 860776 या मोबाइल क्रमांकावरून माझ्यावर गुन्हा दाखल कराल तर मी आत्महत्या करेन असा धमकीवजा संदेश पाठविला.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अखेर काशिनाथ लांडे यांनी कुंटुर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीवरून गजानन शिंदे आणि आनंद शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार नकाते हे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!