Saturday, November 23, 2024

डॉक्टरचा गोळ्या घालून खून करणाऱ्या मुख्य आरोपीस अखेर 24 दिवसांनी मध्य प्रदेशातून अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ न्यायालयाने ठोठावली 10 दिवसांची पोलीस कोठडी

उमरखेड/ नांदेड– मूळ नांदेडचे असलेले, पण उमरखेड येथे कार्यरत डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा गोळ्या घालून खून करणाऱ्या मुख्य आरोपीस अखेर 24 दिवसांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपी शेख ऐफाज यास मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा दि. ११ जानेवारी रोजी भररस्त्यावर गोळ्या झाडून निर्घुण खून करण्यात आला. त्यानंतर डॉ धर्मकारे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात सहभागी असणाऱ्या पाच पैकी चौघांना पोलिसांकडून यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पण मुख्य आरोपी मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. घटनेच्या तब्बल 24 दिवसांनंतर त्याला मध्य प्रदेशातील धार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.

शहरातील पुसद मार्गावर मोटारसायकलवर आलेल्या मास्कधारी मारेकर्‍यांनी डॉ. धर्मकारे यांचा गावठी रिव्हॉल्व्हर अर्थात देशी कट्यातून गोळ्या झाडून खून केला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकरी शेख ऐफाज शेख अब्रार उर्फ अप्पू याच्या चार साथीदारांना अटक केली. होती. त्यामध्ये त्याचा मामा सैयद तौसिफ सैयद खलील (वय ३५), सय्यद मुस्ताक शेख खलील (३२), शेख मोहसीन शेख कयूम (३४) शेख शाहरुख शेख कलम (२७) सर्व राहणार ढाणकी आदिंचा समावेश होता. मात्र मुख्य मारेकरी प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर 24 दिवसांनंतर मुख्य आरोपीस मध्यप्रदेशातील धार येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्‍याला अटक करण्यात यश आले. त्यानंतर काल शनिवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आरोपीस दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी नांदेड तसेच उमरखेड बंद पाळला होता. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केले होते. त्यामुळे मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव होता. पण आता अखेर त्यास अटक झाली असून मुख्य आरोपी गजाआड झाल्याने हत्याकांडातील अनेक बाबी पुढे येणार आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!