Friday, March 29, 2024

दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी पकडले; तीन दिवसांची पोलीस कोठडी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- भाऊ कारागृहात असल्याची बतावणी करून त्याला सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागून तलवारीने चार चाकी वाहनावर हल्ला करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलीस निरीक्षक संजय ननवरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू गिते यांनी आपल्या पथकासह काल रात्रभर मोहिम राबवून या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

नांदेड शहराच्या गंगानगर सोसायटी येथील व्यापारी रामाश्रय विश्वनाथ सहाने (वय 37) हे दि. 14 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घराकडे जात होते. त्यांची गाडी दोघांनी अडविली. मोबाईल फोनवर सांगितल्याप्रमाणे दहा लाख रुपयांची खंडणी दे अशी मागणी त्यांनी सुरू केली. माझ्याकडे पैसे नाहीत, असे रामाश्रय सहानी यांनी म्हणताच मेरा भाई जेल मे है, उसको छुडाने के लिए, दस लाख रुपये दे दो, नही तो तुझे जान से मार दुंगा’ असे म्हणत या दोन आरोपींनी रामाश्रय सहानी यांच्या चार चाकी वाहनावर तलवारीने हल्ला चढविला. तसेच गाडीच्या दरवाजावर लाथा मारून जीवे मारण्याची धमकी दिली.

रामाश्रय सहानी यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने फिरवत पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळाचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी आपले सहकारी अधिकारी एपीआय बाळू गीते, एएसआय बाबा गजभारे, हवालदार दारासिंग राठोड, बंडू कलंदर, गंगावणे आणि होमगार्ड केंद्रे यांना सोबत घेऊन तपास सुरू केला.

खंडणी मागणारे नाग्या पोचीराम गायकवाड आणि आकाश गोविंद लुळे हे दोघेजण भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी रात्रभर त्यांना पिंजून काढत अखेर त्यांना अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!