Friday, March 29, 2024

नांदेडमध्ये 4 इलेक्ट्रिक बाईक जप्त, एकूण 8 इलेक्ट्रिक बाईकमध्ये आढळले दोष; आरटीओ कार्यालयाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ 36 ई-बाइक्सची करण्यात आली तपासणी

नांदेड- प्रादेशिक परिवहन कार्यालय वायुवेग पथकाने नांदेड शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या 36 ई-बाईक्सची तपासणी 23 व 24 मे रोजी केली. यावेळी 8 वाहने दोषी आढळून आले असून त्यापैकी 4 वाहने जप्त केली आहेत.  आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या गाड्यांची तपासणी मोहिम आरटीओ कार्यालयाकडून करण्यात येत आहे. याच तपासणी मोहिमेदरम्यान नांदेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ई-बाईक्स वाहनात अनधिकृत बदल करू नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम 26 व 27 मे 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहन धारकाविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येईल. तसेच ज्या वाहन वितरकांनी ई-बाईक्सच्या विक्रीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडकडून व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त केले नाही त्यांनी लवकरात-लवकर व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!