Thursday, March 28, 2024

परळीजवळील भीषण कार अपघातात भोकरचे दोन तरुण ठार, एक गंभीर जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर/ नांदेड– परळीजवळील कार झाडाला धडकून झलेल्या भीषण अपघातात भोकरचे दोन तरुण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे.

तेलगाव- परळीकडुन भरधाव वेगात येणारी स्वीप्ट डिझायर गाडी बाभळीच्या झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी तेलगाव- परळी महामार्गावर टेलगाव येथे ही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात गाडी पुर्ण चक्काचुर झाली आहे. मयत व जखमींना जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शेख युसूफ शेख शादुल, सचिन मोकमपल्ले व अमोल वाघमारे (सर्व राहणार शहिद प्रफुल्ल नगर, भोकर) हे तीन तरूण रविवारी एम. एच.१३ सीके ०४४१ या स्वीप्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगावमार्गे बीडला निघाले होते. तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबारजवळ सदर गाडी आली असता चालकाचे स्टेरिंगवरील नियंञण सुटल्याने गाडी रोडलगत खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. गाडी एवढ्या जोरात धडकली की, पूर्वेकडुन येणाऱ्या या कारचे तोंड उत्तरेकडे झाले. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेले तरूण शेख युसूफ शेख शादुल व सचिन मोकमपल्ले हे जागीच ठार झाले. तर मागच्या सिटवर बसलेला तरूण दोन्ही सिटमध्ये अडकला, तो जखमी आहे. मयत व जखमी भोकरचे आहेत. त्या तरूणांच्या मोबाईलवर फोनवरून तरुणांची ओळख पटविल्याचे सांगण्यात येते.

गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले. अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगच्या मदतीने एका मयतास बाहेर काढण्यात आले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.

मयत व जखमींना १०८ रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी भान दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यामुळे एका जखमी तरूणाचा जीव वाचला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!