Friday, March 29, 2024

पुणे-नगर महामार्गावर नायगाव तालुक्यातील इसम मोटारसायकलसहित नदीत कोसळला; दुर्दैवी मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नायगाव (जि. नांदेड)- पुणे-नगर रोड जवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक इसम दुचाकीसह पुलावरून खाली पाण्यात कोसळला. यात शिक्रापूरजवळ दुचाकीसह पुलावरून पाण्यात कोसळून या इसमाचा मृत्यू झाला.

किरण दिगंबर पाटील असे या घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव असून ते मूळ नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास हा इसम दुचाकीसह पुलाच्या खाली पाण्यात कोसळला असल्याचे पाठीमागून आलेल्या नागरिकांना दिसले. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस व काही ग्रामस्थ यांनी सदर ठिकाणी पाहणी केली.

विजेची व्यवस्था करत ओढ्याच्या पाण्यामध्ये पडलेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्यामध्ये पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात यश आले. मात्र, पाण्यामध्ये पडलेल्या इसमाचा पाण्याची खोली व त्यामधील गाळ यामुळे शोध लागत नव्हता.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दलाच्या जवानांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. प्राधिकरणचे अग्निशमन अधिकारी, जवान आदींनी पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्याचे नाव किरणकुमार दिगंबर पाटील (वय 42 वर्षे) असे असून ते मूळ नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मरवाळी येथील आहेत. ते सध्या शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील दत्तनगर भागात वास्तव्यास होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!