Friday, March 29, 2024

बेपत्ता असलेल्या नांदेडच्या डॉक्टरचा मृतदेह दौलताबादजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; पोलीस दलात हळहळ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- औरंगाबादकडे निघाल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या नांदेड जिल्ह्यातील योगेश तिडकेची बेपत्ता झाल्याची नोंद नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आज त्याचा मृतदेह मृतदेह औरंगाबादनजीकच्या  दौलताबादजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला असून यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीस दलात सध्या मनाठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नरेंद्र तिडके यांचा मुलगा योगेश तिडके (वय २५) याने दौलताबाद शिवारात दोरीने गळफास घेऊन 29 मे रोजी सहाच्या सुमारास आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे योगेश तिडके हरवल्याची नोंद नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

माळाकोळी तालुका लोहा येथील नरेंद्र तिडके यांचा मुलगा योगेश हा औरंगाबाद येथे दंतचिकित्सक बीडीएसचे शिक्षण घेत होता. तो नुकताच नांदेडला आपल्या पालकांना भेटण्यासाठी आला होता. औरंगाबादला निघण्यासाठी तो नांदेड रेल्वे स्थानकावरून तपोवन एक्सप्रेसमध्ये बसून दि. २९ मे रोजी गेला. परंतु तो औरंगाबादला पोहोचला नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. यावेळी औरंगाबादपासून जवळच असलेल्या दौलताबाद शिवारात एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर तिडके कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. योगेश हा नरेंद्र तिडके यांचा एकुलता एक मुलगा होता, असे त्यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!